अनेक फुलांचा ताटवा आपल्या समोर थाटला जावा अन आपल्याला कळूच नये त्यातले कोणते घ्यावे..गुलाब तर खुणावतोच..जाईजुईचा नाजूकपणाही मोहवून टाकतो..त्याच वेळेला मोगराही
त्याच्या सुवासाने साद घालतो..क्षण काळाचंच अस्तित्व घेवून आलेला "पारिजातक.."अंतिम श्वासापर्यंत दरवळण्याच,त्यागाचे मोठेपण सांगून जातो..
अगदी असचं आपल्या मनातील भावनांचं होत..त्यातील काही भावना आनंद देणाऱ्या असतात तर काही खूप कष्टी करणाऱ्या..काही हव्याहव्याश्या तर काही जिवच गुदमरून टाकणाऱ्या..काही मोरपिशी पंख लावण्यास सुचविणार्या तर काही खोल डोहात नेणाऱ्या..पण ह्यातील एकही भावना आपण नाकारू शकतं नाही.. हे सर्व भावविश्वचं तर नकळतपणे जीवनाला अर्थपूर्णता देतं असतं...
भावना टिकतात पारिजातका सारख्या क्षण काळ..अन देवून जातात शब्दरूपी चारोळ्यांचा नजराणा..

No comments:
Post a Comment