Thursday, December 15, 2011

सूर असे झंकारले,
ताल ऐसे ठेकले..
हृदयाचे हृदयाला गुज,
न सांगता उमगले.. 


मागे वळून पाहतांना,
खूप काही दिसत जात..
साठवून फक्त हृदयात,
गप्प बसावं लागत..


तुझ्या शिवाय माझ्या हृदयाचा, 
एक कोपरा रीताच राहील..
तुझ्या शिवाय माझं जीवन,
शुष्क वैरण वाळवंट होईल..


आपल्या जवळ नाही जे, 
त्यासाठी कशाला झुरायचं..
आहे त्यात समाधान मानून, 
पुढे पुढेच चालायचं..