MAN-PAKHARU
Thursday, November 13, 2014
तुझा संग,
तुझा सुगंध..।
मनात दरवळे,
अजूनही मृदगंध..।।
-रो..
Monday, August 25, 2014
बदलून पहावी भूमिका,
एकदाचं फक्त..।
कलेलं तुम्हास तुमच्या,
कार्यकृतीतील सत्व..।।
-RO
सगलचं वरवरचं ,
वार्र्यावर उडणं..।
जरा रुजून तर पहा,
उमगेल बीजाचं अंकुरणं..।।
-रो.
ना कुणाची भीती,
ना कुणाची क्षीती..।
मुक्त मनाची,
मुक्त कलाकृती..।।
-रो..
अशी कशी असते,
ही सावली ?
अंधारात चाचपडतांना ,
निघून जाते मागच्या पावली.
.रो..
मरणं खूप सोपं असतं,
जगणं अवघड असतं..।
अन मला,
अवघड गोष्टी करायला आवडतात..।।
-RO..
एकाकी आभाल,
सोबतीसाठी तरसले..
।आठवण येता धरतीची,
उत्कटतेने बरसले..।।
-रो..
मोडले तोडले तरीही,
वाकणार नाही..।
पुन्हा जिद्दीने अंकुरेण,
झुकणार नाही..।।
-रो..
जे पटत नाही ,
ते नाहिचं पटत पण,
जे पटतं
ते कसून तपासलेलं असतं..!
!-रो..
मखमली सावली,
काली-पिवली..।
समीप येवून वदे,
असे मी बावली..।।
-रो..
एकचं डाग,
तोही कशाला..?
स्वच्छ सुंदर वस्र,
असू द्या ना गाठीला..।।
-रो...
Wednesday, March 12, 2014
जिद्दीच्या पंखांना ,
आकाशही तोकडं पडतं..।
सार बल एकवटलं की,
अशक्यही शक्य होतं..।।
-रो..
मी तिथेचं तशीचं उभी,
तुझी वाट पहातं..।
तू सहजचं निघून गेलास,
जणू मी अज्ञात..।।
-रो..
सत्य मागत असतं,
स्वातंत्र्याची आहुती..।
तू पुढे चालत रहा,
फिरु नकोस मागुती..।।
-रो.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)