Friday, November 25, 2011


जेव्हा नाती बद्भ होतात,
तेव्हा कशाचीच तमा नसते..
हमरस्ता अन पाऊलवाटाच काय,
महासागर ओलांडण्याची जिद्द असते..


Monday, November 14, 2011

कशाला हवी ती धडपड
कशाला हवा तो प्रवास
रोखून धरावा आता श्वास
संपवावा एकदाचा वनवास..



कोणतीही नशा
ही शेवटी नशाच
ओसरली की उमगते
झालेली स्वत:ची दुर्दशा..


कितीही केला आयुष्यभर प्रयास
तरी एक अधिक एक होतच नाही
एकातून एक वजा होऊन श्युन्य कधी उरतो
हे आपलचं आपल्याला कळत नाही..


मृत्यूलाही असं कवटाळावं 
राखेचाही भार न राहावा 
निमुटपणे निघून जावं 
कोणताही करार न उरावा.. 


एखाद्याचं आपल्या मनातलं स्थान
इतकं कसं स्थितप्रज्ञ असतं,
स्वप्नं भंगुन गेली तरीही
ते मात्र अभंगच असतं..











Wednesday, November 2, 2011



मी ही ठरवलंय आता,
दाटलेला मेघ व्हायचं..
कितीही आला थंडगार वारा,
तरीही मुळीच नाही बरसायचं..