Saturday, December 28, 2013

मला काय पहायचे ,
शब्द येतील माझे कानी..
साठवा आपल्या हृदयात ,
गातील समृद्धीची गाणी..!!
-रो..
असे मी निवांत,
स्वप्नांच्या दुनियेत..।
पोखरु द्या वेदनेला कितीही,
तरीही मी मजेत..।।
रो..
अजूनही न्याहालते,
त्याचं त्या पाऊलखुणा..।
जाऊ नकोस पुढती,
माघारी ये पुन्हा..।।
-रो..
स्वत्वाच्या माझ्याचं घराचे,
छत आहे गलके..।
वेदनाचं समजावते,
कोण आपले कोण परके..।।
-रो..
 
तू बरसत जातोस,
मी वेचीत जाते..।
सहज सुंदर आपले नाते,
ह्रदयांतरी जपत रहाते..।।
-रो..
 
शिंपले वेचता वेचता,
पिंजून काढिला किनारा..।
मोतीचं रंगिबेरंगी की,
मनीचा खेल सारा..।।
-रो..
 
Photo: शिंपले वेचता वेचता,पिंजून काढिला किनारा..।मोतीचं रंगिबेरंगी की,मनीचा खेल सारा..।।-रो..
मनात जे उमटतं,
ते जगात सांगता येत नाही..।
प्रत्येकाचा मुखवटाचं,
त्याशिवाय पर्याय नाही..।।
-रो..
नियतीनं ज्यांना युद्धासाठीचं प्रसवलं,
त्यांनी कधीचं हरायचं नसतं..।
स्वतःचं स्वतःशी लढतं लढतं,
महायुद्धही जिंकायचं असतं..।।
-रो..
नसे खेद ना खंत,
होवो कोणत्याही अंगे व्यंग..। 
नको कोणत्याही शंकाकूशंका,
राहो माझे मन अव्यंग..।।
-रो..
हृद्यस्थ अन कर्तव्यपरायणता,
ह्यात असतं महद्‍अंतर..।
 दोन्हीत समतोलता,
हेचं शहाणपणाचं लक्षणं..।।
रो..
कागदावरील रेषा,
आकाशाला भिडल्या..।
अंतरातील गुज,
 सांगूनी गेल्या..।।
रो..
तुझ्या येण्याची चाहूल,
हा हलूवार प्राजक्त..।
कुठे कश्याचाचं मेळ  नाही,
अन मी भक्त..।।-रो....
तू अस्तित्व,
मी सावली..।
तुझ्यात विसावलेली,
इवलीशी बाहुली..।।
-रो..
जखम जितकी खोल,
तितका भरायला वेळ लागतो..।
ती भरुन येतांना,
आपला भलताचं तोल जातो..।।
-रो....