Saturday, June 22, 2013

सहजच आपुलकीने काही विचारावं,
 त्यांना वाटे चांभारचौकशी..।
जाऊ देत कशाला तरी विचारावं,
गप्पच मी रहाते कशी..।।-रो..
एक तरी पोकली हवी,
न भरुन निघणारी..।
कितीही भरत गेले तरी,
अंती रितीचं राहणारी..।।-रो..
Photo: एक तरी पोकली हवी,न भरुन निघणारी..।कितीही भरत गेले तरी,अंती रितीचं  राहणारी..।।-रो..
सारं जग खोटं,
मीच तेवढा खरा..। 
असं होईलच कसं,
जरा विचार करा..।।
रो..

Friday, June 14, 2013

 

स्वल्‍पविरामा एवढ थांबावं, 
समजून घ्यावं किंचीतस..।
 कालाचं बोट धरुन चालावचं,
 मागं वलून बघावं किंचीतसं..।।
-रो..
 

दररोजच्या दमछाकिला,
 अंतर्मुखतेचं अस्तर हवं..।
 मनातल्या अस्थिर घराला, 
नैतिकतेचं अधिष्ठान हवं..।।
-रो..