Monday, May 23, 2011
जीवनाच कोडं म्हणतात
असं एक कोडं असतं
त्याच्या प्रश्नाचं उत्तर
प्रश्नातच सापडत असतं..
आठवणींची गरजच नसते
जेव्हा आठवणच आठव असते
कशाला बहाणा करावा उगीचच
विस्मृतीत काही जातच नसते..
सवय झाली मला आता
मुकं मुकं राहण्याची
बोलायचं असतं मनातलं जेव्हा
वेगळचं बोलून जाण्याची..
माझी प्रेम भावना
मी अशीच अबोल ठेवीन
तुला कळली तर ठीक
नाहीतर चोरकप्प्यात दडवून ठेवीन..
Tuesday, May 17, 2011
दुनियेच्या पसार्यात तुला,
माझी आठवण येणार नाही..
एकांतात असतांना मात्र,
माझ्याशिवाय पसाराच होणार नाही..
प्रेम उमगण्यासाठी स्वत:ला,
मृत्युच्या मुशीत लोटाव लागत..
कण कण झिजून स्वत:,
दुसर्यासाठी जगावं लागत..
बेधुंदीचे ते क्षण,
धुंद होवून गेले..
मनाच्या चोर कप्प्यात,
ठेव ठेवून गेले..
तुला काय हवय हे,
तुलाही कळत नाही..
मला कळलं तरीही,
मी ते तुला कळवत नाही..
Subscribe to:
Posts (Atom)


