आठ्वणींच एक विचित्रच
कोडं असतं..
सुखद असल्यातर..
ते क्षण विरले म्हणून
मन अस्वस्थ होतं..
अन दु:खद असल्यातर..
त्या जाणिवेनेच हृदय
पिळवटून निघतं..
तुला नाही कळायचं
माझ्या मनातलं गुपित
मी ते दडवलय
माझ्या हृदयाच्या कुपीत..
मनातले इमले मनात
अश्यारितीने रचले जातात
कोसळू लागतात जेव्हा ते
'स्व'लाच जमीनदोस्त करतात..
आपल्या पदरात जे पडलय
ते झेलावच लागतं
भाग्यात जे लिहिलय
ते पेलावच लागतं..