MAN-PAKHARU
Sunday, May 13, 2012
गरीबातला गरीब माणूसही,
असतो तेव्हाच श्रीमंत..
जेव्हा माता पित्यांच्या,
वात्सल्याचा असतो वरदहस्त..
एखाद नितळ स्वप्नही,
स्वप्न पाहू लागतं..
जीव ओवाळून टाकावा,
इतकं ते मंगलमय असतं..!
कोणाकडेही जा,कुठेही जा
जग पैशानचं तोलतं..
दिलासायुक्त शब्द हवेत,
तेव्हाही व्यावहारिकता जपतं..
पावसाआधीचा पाऊस बरसून गेला..
तोची सुगंध पुन्हा उधळून गेला..
कसा साठवावा हा अंतरी मृदूगंध..
स्मृतींना नयनात उतरवूनी गेला..।।
क्षणाचा विसावा,क्षणाचा ओलावा..
पुन्हा न बरसणे,ऐसा नको दुरावा..
यायचेच असेल तर असा येवून जा..
अंतर मंदिर ओलेचिंब करुनीया जा..।।
..
गुलाबाच्या फुलाचं एक,
विचित्रचं कोड असतं..
ज्यांना पाकळ्या द्यायला जावं,
त्यांनाचं काट्यांनी ओरबाडतं..।।
"निमूट.."
फुलालाही वाटतं असतं,
खूप खूप फुलावं..
फुलपाखरासारखं पंख पसरुन,
आकाशात उडावं..!
कळीचं फूल,
हसतं हसत फुलतं..
घेता आकाशात भरारी,
पाकळ्या गळून "निमूट" पडतं..!!
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)