Thursday, April 28, 2011

प्रेमात असं, 
वाहवत नाही जायचं..
त्यातही योग्य ते शोधण्याचं,
 कसब ठेवायचं..


स्वप्नातलं गाव खुपचं,
मोठ असतं..
वास्तवातल्या गावाला,
कुणाचचं नाव नसतं..


तुला वाटतं,
तुझ्यासाठी झुरते मी..
अरे वेड्या,खर तर 
तुझ्यासाठीचं जगते मी..


कधी कधी खूप गंमत असते,
आपल्याला नक्की काय हवे,
हेच आपल्याला कळत नसते..                 

Thursday, April 21, 2011

शिंपल्या एवढ्या काळजाची तशीच हुरहूर..
जिव्हाळ्याच्या मैत्रीचा असे हा निराळाच नूर..
नको ना येवू देवू  असा  उगा गंभिरतेचा पूर..
अजून प्रवास करायचा  आहे खूप दूर दूर..  
आपल्या मैत्रीत नक्कीच आहे काही खास,  
जसा गणपती जवळ दुर्वांचा अधिवास..
तुझ्या स्नेहाची नित्य असते मला आस,
जसा गणपतीला मोदकांचा हव्यास..
अशी असते तुझ्या आठवणींची सोबत,
जसा गणपती सोबत असतो मूषक..  
तुझ्या लेखी माझी किंमत
शून्य असतानाही,
मी तुझ्यासाठी 
एक लिहिण्याचा अट्टहास केला..
तू मात्र एकातून एक वजा करून,
 माझी पदरी शून्यच दिला.. 


आपल्याला स्वत:पेक्षाही एखाद्यावर 
नको इतका विश्वास असतो,
म्हणूनच झोपेतून त्या जागे होताना 
स्वत:चाच दु:श्वास वाटतो..


Tuesday, April 19, 2011

तू म्हणजे माझ्यासाठी,
हक्काचा निवारा..
जीवनाच्या अंतापर्यनतचा,
एकमेव सहारा.. 
तू बोलत नाहीस जेव्हा,
तुझ्या मनात अबोली फुलते..
नि:शब्दपणे मग ती,
माझ्या ओंजळीत येऊन पहुडते.. 


मी एकटीच तुझ्याशी,
खूप खूप बोलत असते..
तुझ्या प्रतिसादाविना,
स्वत:लाच तोलत असते..


कधी कधी वाटतं,
जीवन हेच एक स्वप्न आहे..
कसं ठरवावं मग, 
काय सत्य अन  काय असत्य आहे..


तुझ्या माझ्यातलं अंतर,
म्हणजे दुरावा नाही..
तुलाही उमगतय हे,
म्हणूनच त्याला पुरावा नाही..


एकांताच्या क्षणीही आता,
स्वत:ला सावरायचं..
इतक्या  दिवस जपलं तुला,
आता स्वत:लाच लपवायचं..


मनातल्या मनात मी उगा,
खंत करत असते..
तू येणार नाही कळत असूनही,
तुझी वाट पहात बसते..
         

Saturday, April 16, 2011

ओंजळ काठोकाठ  भरलेली असतांना,
नको येवूस माझ्याकडे..
माझ्या थेंबांना,   
 त्यात जागाच राहणार नाही..
ओंजळ रिती झाली कि,
धावत ये माझ्याकडे..
  मी ती मुळीच रिती ठेवणार नाही..   
तुला हवा असतो,
आनंदाचा सागर.. 
दु:खाची नको असते, 
एकही सर..
नौका डगमगू लागता तुझी,
सावरायला हवे असतात
 माझेच कर..

सर्वच जण मारतात,
मूकपणाने आरोळी..
त्याचीच मग होते,
माझी चारोळी..



शब्द तेच वाक्य तेच,
संदर्भ का बदलायचे..
कल्पनेतल्या विश्वाला,
थोडेसे वास्तवात येवू द्यायचे..  



मनातलं कुणालाच 
सांगता येत नाही..
म्हणून तर कुणाशीच,
भांडता येत नाही..


संवेदना जाणवण्याची,
मला चांगलीच शिक्षा आहे..
प्रत्येक क्षणात द्यावी लागते,
मला एक परीक्षा आहे..  

  

Tuesday, April 12, 2011

                                                       भावनेच्या उन्हाळ्याला,
भावनेचंच   शहाळ लागतं...
                                                 तसाच थंडावा नाही मिळाला तर,
                                                  अवघं जीवनच करपून जातं..

प्राजक्ताची माझी ओंजळ
अशीच भरलेली राहू द्या..
दरवळणे हाच गुण तिचा
हेच स्मृतीत ठसू द्या.. 

Monday, April 11, 2011

http://roraj.blogspot.com

      अनेक फुलांचा ताटवा आपल्या समोर  थाटला जावा अन आपल्याला कळूच नये त्यातले कोणते घ्यावे..गुलाब तर खुणावतोच..जाईजुईचा नाजूकपणाही मोहवून टाकतो..त्याच वेळेला  मोगराही
त्याच्या सुवासाने साद घालतो..क्षण काळाचंच  अस्तित्व घेवून आलेला "पारिजातक.."अंतिम श्वासापर्यंत दरवळण्याच,त्यागाचे  मोठेपण सांगून जातो..
     अगदी असचं आपल्या मनातील भावनांचं होत..त्यातील काही भावना  आनंद देणाऱ्या  असतात तर काही खूप कष्टी करणाऱ्या..काही हव्याहव्याश्या तर काही जिवच गुदमरून टाकणाऱ्या..काही मोरपिशी पंख   लावण्यास सुचविणार्या तर काही खोल डोहात नेणाऱ्या..पण ह्यातील एकही भावना आपण नाकारू शकतं नाही.. हे सर्व भावविश्वचं तर नकळतपणे जीवनाला अर्थपूर्णता देतं असतं...
    भावना टिकतात पारिजातका सारख्या क्षण काळ..अन देवून जातात शब्दरूपी चारोळ्यांचा नजराणा..