Tuesday, April 19, 2011

मी एकटीच तुझ्याशी,
खूप खूप बोलत असते..
तुझ्या प्रतिसादाविना,
स्वत:लाच तोलत असते..


कधी कधी वाटतं,
जीवन हेच एक स्वप्न आहे..
कसं ठरवावं मग, 
काय सत्य अन  काय असत्य आहे..


तुझ्या माझ्यातलं अंतर,
म्हणजे दुरावा नाही..
तुलाही उमगतय हे,
म्हणूनच त्याला पुरावा नाही..


एकांताच्या क्षणीही आता,
स्वत:ला सावरायचं..
इतक्या  दिवस जपलं तुला,
आता स्वत:लाच लपवायचं..


मनातल्या मनात मी उगा,
खंत करत असते..
तू येणार नाही कळत असूनही,
तुझी वाट पहात बसते..
         

No comments:

Post a Comment