Monday, September 9, 2013

जाऊ दे,
 आता मी प्रश्न विचारणचं टाकलयं..।
कारण,उत्तर येणार नाही ह्या
 भीतीनचं मला ग्रासलयं..।।-रो

.

इतकं दूरही जावू नये की,
अंतर कापणं मुश्कील होईल..। 
इतकं जवलही राहू नये की,
चालणचं पावलात हरवून जाईल..।।-रो..

Sunday, September 8, 2013

तू ही एक किनारा,
मी ही एक किनारा..।
सांग कसा मागु ,
तुजला मी सहारा..।।
-रो..
प्रत्येकास हवं असतं,
एक खेलणं,खेलण्यासाठी..।
खेलून झालं की,
मोडूनतोडून,फेकण्यासाठी..!!