MAN-PAKHARU
Wednesday, April 1, 2015
राखेच्या धुळवडीचा,
खेळ निराळा..।
प्रशांत निखारा,
निवलेला अंगारा..।।
रो..
तेचं ते जगतांनाही,
गवसतं बरचं काही..।
अश्रूंची बांधता तोरणे,
आनंदही निमूट येई..।।
रो..
पाऊस म्हणाला,
माणसं दरवर्षी रंगपंचमी खेळतात,
अन् वर्षभर रंग दाखवतात..।
आता मी रंगपंचमी खेळणार,
अन् माझे रंग दाखवणार..।।
बसा बघत.....................!!
रो..
आतले अन् बाहेरचे,
प्रत्येकाचे जग वेगळे..।
तुझे जग तुझे,
माझे जग माझे..।।
रो..
आपणचं आपल्याला
नावाजी,
म्हणे मस्तानीचा
मीचं बाजी..।
थडग्यावरची सुकलेली फुले,
केविलवाणी हसतात..।
पुन्हा फिरुनी जीवन नाही,
हेचं सत्य वदतात..।।
रो..
पुढे काय पुढे काय,
विचार कशाला करित बसावे..।
पुढे पुढे चालत राहून,
आनंदी क्षण वेचून घ्यावे..।।
निर्झरा सारखे व्हावे मी ही,
अवखळ अन् नितळ निर्मळ..।
वाहूनी जाव्या क्लेशभावना,
निरपेक्ष रहावे निरंतर अंतर..।।
रो..
ओंजळ भरलेलीचं रहाते,
पसायदान करणार्यांची..।
अवघेची दान करतांना,
स्वत्वही त्यागणार्यांची..।।
रो..
नकोत कोणते प्रश्न,
नकोचं कोणती उत्तरे..।
सहज व्हावे स्वीकारणे,
तैसे सहजची जगणे..।।
रो..
एक शून्य,
महाशून्य झालं..।
अवघं गणितचं,
बदलून गेलं..।।
रो..
आपल्या स्वप्नांचंच व्यंगचित्र,
आपल्याला हसतं..।
वास्तवतेचं बोट धरुन,
चालायला शिकवतं..।।
...
रो..
आज भिक घातली,
एका प्रतिष्ठित ,
श्रीमंत भिकार्याला..
पण,
दानाचं समाधान शून्य,
...
उलट पश्चाताप..
रो..
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)