Tuesday, July 5, 2011


जीवाच्या आकांताने,बेभान होऊन
शब्दाला शब्द जुळवीत जावं..
क्षणात शाईची दौत उपडी होऊन
सार काही भिजून,मिटून जावं..   

ओंजळ ओतप्रोत भरलेली
रिती कधीच नाही व्हायची..
प्रेमाच्या ह्या सागराला 
ओहोटी कधीच नाही लागायची...!