Monday, May 23, 2011

जीवनाच कोडं म्हणतात
असं एक कोडं असतं
त्याच्या प्रश्नाचं उत्तर
प्रश्नातच सापडत असतं..


आठवणींची गरजच नसते 
जेव्हा आठवणच आठव असते
कशाला बहाणा करावा उगीचच
विस्मृतीत काही जातच नसते..


सवय झाली मला आता 
मुकं मुकं राहण्याची
बोलायचं असतं मनातलं जेव्हा 
वेगळचं बोलून जाण्याची..


माझी प्रेम भावना 
मी अशीच अबोल ठेवीन 
तुला कळली तर ठीक 
नाहीतर चोरकप्प्यात दडवून ठेवीन..    

No comments:

Post a Comment