कशाला हवी ती धडपड
कशाला हवा तो प्रवास
रोखून धरावा आता श्वास
संपवावा एकदाचा वनवास..
कोणतीही नशा
ही शेवटी नशाच
ओसरली की उमगते
झालेली स्वत:ची दुर्दशा..
कितीही केला आयुष्यभर प्रयास
तरी एक अधिक एक होतच नाही
एकातून एक वजा होऊन श्युन्य कधी उरतो
हे आपलचं आपल्याला कळत नाही..
मृत्यूलाही असं कवटाळावं
राखेचाही भार न राहावा
निमुटपणे निघून जावं
कोणताही करार न उरावा..
No comments:
Post a Comment