Monday, June 20, 2011

मला कितीही सांगितले शांत बस
मी थोडीच ऐकणार आहे,
शेवटी तुला जे करायचं ते तू कर 
मला जे करायचं तेचं मी करणार आहे..


माझ्या कवितेची प्रत्येक ओळ 
तुला आर्ततेने साद घालते, 
तू शब्दांनाच घाबरतोस 
मग ती कोषात मिटून जाते.. 


मी अन तू ह्यांचं
अद्वैत होता मैत्री जुळते,
मी अन तू स्वतंत्र होता 
मैत्री कुठे असते..? 


ज्या क्षणी सावध रहायचं
त्या क्षणी बेसावध राहिले मी
त्याच क्षणी झाली माझी  परीक्षा
अन पुरती नापास झाले मी..

No comments:

Post a Comment